गर्भ इकोकार्डिओग्राफीचे महत्व


 जन्मजात हृदयरोग ( Congenital Heart Disease) CHD हे मुलांच्या जीवनात प्रथम वर्षात होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. जन्माला येणाऱ्या  बालका मध्ये जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण  हजारात  4 पासून हजारात दहा पर्यंत असते.  वेगवेगळ्या अभ्यासाद्वारे हे निश्चित झाले की दर हजारात.. जन्माला येणाऱ्या 3 बालकांना अतिशय तीव्र रोगाचा सामना करावा लागतो आणि त्यांना निष्णात हृदयरोग तज्ज्ञाची गरज पडते यावरून जन्मजात हृदयरोगाचे निदान लवकरात लवकर होणे किती आवश्यक असते हे प्रकर्षाने लक्षात येते. आणि हे आता गर्भ इकोकार्डिओग्राफी च्या  साह्याने गर्भाच्या सुरुवातीच्या काळात करणे शक्य झाले आहे.




 गर्भ इकोकार्डिओग्राफी  काय आहे?(What is Fetal Echocardiography?)
 गर्भ इकोकार्डिओग्राफी ही एक अल्ट्रासाऊंड परीक्षा आहे याद्वारे बाळाच्या हृदयाच्या स्थितीचे नेमके ज्ञान गर्भार काळातच होऊ शकते.इकोकार्डिओग्राफी द्वारा  हृदयाचा आकार कार्याचे मूल्यमापन केले जाते.  स्त्री18 ते 24  आठवड्याची गर्भार असताना ही चाचणी केली जाते. गर्भ इकोकार्डिओग्राफी ही सुरक्षित आणि गर्भाच्या शरीरात प्रवेश करता वापरले जाणारे तंत्र आहे.
गर्भाचा  इकोकार्डिओग्राम हा विशेष दृष्टीने प्रशिक्षित अशा सोनोग्राफी तज्ज्ञांकडून  करविला जातो. त्याचे विश्लेषण/ अर्थ लावण्याचे काम बाल  हृदयरोग तज्ञ करतात. गर्भ  इकोकार्डिओग्राफी मुळे समस्या सुरुवातीलाच लक्षात येतात.  तसेच जन्मजात हृदयरोगाचे  प्रमाणात घट साध्य केली जाऊ शकते.  त्यामुळे जन्मजात हृदयरोग ... कमी याही प्रकारे कमी होऊ शकेल की गुंतागुंतीच्या स्थितीत रोगनिवारक गर्भपात म्हणजेच सोडविता येणार  रोग अस्तित्वातच येणार नाही असे केले जाऊ शकेल.  जन्मजात हृदयरोग याबरोबरच  इतर विकृती गुणसूत्रीय वैगुण्ये  याचीदेखील यामुळे तपासणी होऊन जाते. जन्माच्या वेळेस जन्मजात हृदयरोग ओळखला जाऊ शकत नाही  कारण बरीच नवजात बालके  ज्यांना जन्मजात हृदयरोग  आहे अशांना यासंबंधी निदान केल्याशिवाय   घरी पाठवण्यात येते.25% नवजात शिशु ज्यांना  गंभीर जन्मजात हृदयरोग आहे  अशांना बिना निदान घरी पाठवण्यात येते. आणि यापैकी जे उपचारासाठी येतात त्यात हार मोठ्या विकृतीच्या किंवा ऑपरेशनच्या आधीच मृत्यू पावणाऱ्यांची फार जास्त संख्या भरते कारण उशिरा उपचारासाठी बालहृदयरोग तज्ञापर्यंत पोहचतात.
 म्हणून जन्मजात हृदयरोग याचा तपास/ निदान  फार महत्त्वाचे आहे जेणेकरून जन्मानंतर  त्यात मोठा सुधार घडवून आणला जाऊ शकेल.
 सद्यस्थितीत  गर्भ हृदयरोगशास्त्र  फार मोठे आशादायक समजले जाते भारतात जन्मजात हृदयरोग याचा उपचार प्रमाणभूत झाला आहे,  त्याच्या गुणवत्तेचा दर्जा वरचा आहे.
 गर्भ इकोकार्डिओग्राफी  संबंधी काही प्रश्न
1.     गर्भ इकोकार्डिओग्राफी प्रत्येक गर्भावस्थेच्या  वेळेस  करणे आवश्यक आहे का?
 उत्तर-  इकोकार्डिओग्राफी मधे गर्भाच्या हृदयाचे ज्ञान होते. तरीही सर्व महिलांना त्यांच्या गर्भावस्थेत इकोकार्डिओग्राफी करणे आवश्यक  नाही.
2)    ते का करायचे?
उत्तर-  जन्मजात हृदयरोगाचे लवकर निदान होण्यासाठी इकोकार्डिओग्राफी  करणे आवश्यक आहे.  आणि हृदयरोगाचे चे निदान झाले तर उपचार केला जाऊ शकतो. कितीतरी  हृदया संबंधीचे दोष पूर्णपणे बरे केले जाऊ शकतात  आणि पालकांनाही समस्यांना तोंड देण्यासाठी/ त्यांचे निराकरण करण्यासाठी वेळ मिळतो.
3)  हे केंव्हा करावे?  
 उत्तर-   स्त्री ही अठरा ते विस आठवड्यांची गर्भार असताना इको केली जाऊ शकते.
4)  गर्भ  इको कोणी करावी?
 उत्तर- 1] वयस्कर माता > 35 वर्षे(  किंवा यापेक्षा अधिक)
          2]  आधीच्या अपत्याला हृदयासंबंधी  समस्या असल्यास
         3]   ज्या आयांना  गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यात  व्हायरल ताप येत आहे,  अंगावर चट्टे येत आहेत  किंवा सांधेदुखी आहे.
         4]  नियमित अल्ट्रासाउंड मध्ये गर्भात इतर काही दोष आढळल्यास
        5]  नियमितपणा अल्ट्रासाउंड मध्ये गर्भाच्या हृदयाचे ठोके अतिजलद अथवा अतिमंद असल्यास
         6] वारंवार होणारे गर्भपात ज्याचे स्पष्टीकरण देता येत नाही
         7]   बालक  लवकर दगावणे ज्याचे  स्पष्टीकरण देता येत नाही
         8]  कुटुंबात हृदयरोगाचा  पूर्वेतिहास  असल्यास

5) गर्भ इको कोणते डॉक्टर्स करतात?
 उत्तर-  साधारणतः नवजात  हृदयरोग तज्ञ  किंवा गर्भ रोग तज्ञ  इको करतात.  नंतर  नवजात  हृदयरोग तज्ञ आपल्याला हृदयासंबंधी कोणती समस्या आहे त्याच्या उपचाराची माहिती देतात आणि बाळंतपणानंतर त्या नवजात शिशु वर उपचार करतात.
6) गर्भ इकोचे काही बाकी परिणाम ( साइड इफेक्ट्स)  होतात का?
 उत्तर-  नाही,  ही एक वेदना नसलेली शिशु मातेवर  कुठलेही इतर परिणाम होणारी प्रक्रिया आहे.
7) गर्भ इकोचे फायदे ?
1] पालकांना त्यांच्या जन्माला आलेल्या बालकांमध्ये कुठले हृदय  वैगुण्य आहे याची माहिती मिळते बाळंतपणाच्या वेळेस ते ह्या दृष्टीने मानसिकदृष्ट्या तयार राहू शकतात.
2] अतिशय टोकाच्या आणि गंभीर समस्या असलेल्या अवस्थेत गर्भपाताचा सल्ला देण्यात येतो.





Dr Abhay Bhoyar's Congenital Heart Centre, Nagpur
Contact No.7743852944
www.abhaybhoyar.in



Comments

Popular posts from this blog

Importance of Fetal Echocardiography.

Myths/misunderstandings about Congenital Heart Diseases

MENDING TENDER LITTLE HEARTS