Posts

Showing posts from February, 2018

गर्भ इकोकार्डिओग्राफीचे महत्व

Image
  जन्मजात हृदयरोग ( Congenital Heart Disease) CHD हे मुलांच्या जीवनात प्रथम वर्षात होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे . जन्माला येणाऱ्या   बालका मध्ये जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण   हजारात  4 पासून हजारात दहा पर्यंत असते .   वेगवेगळ्या अभ्यासाद्वारे हे निश्चित झाले की दर हजारात .. जन्माला येणाऱ्या 3 बालकांना अतिशय तीव्र रोगाचा सामना करावा लागतो आणि त्यांना निष्णात हृदयरोग तज्ज्ञाची गरज पडते यावरून जन्मजात हृदयरोगाचे निदान लवकरात लवकर होणे किती आवश्यक असते हे प्रकर्षाने लक्षात येते . आणि हे आता गर्भ इकोकार्डिओग्राफी च्या   साह्याने गर्भाच्या सुरुवातीच्या काळात करणे शक्य झाले आहे .   गर्भ इकोकार्डिओग्राफी   काय आहे ?(What is Fetal Echocardiography?)   गर्भ इकोकार्डिओग्राफी ही एक अल्ट्रासाऊंड परीक्षा आहे याद्वारे बाळाच्या हृदयाच्या स्थितीचे नेमके ज्ञान गर्भार काळातच होऊ शकते . इकोकार्डिओग्राफी द्वारा   हृदयाचा आकार व कार्याचे मूल्यमापन केले जाते .   स्त्री 18 ते 24   आठवड्या