गर्भ इकोकार्डिओग्राफीचे महत्व
जन्मजात हृदयरोग ( Congenital Heart Disease) CHD हे मुलांच्या जीवनात प्रथम वर्षात होणाऱ्या मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे . जन्माला येणाऱ्या बालका मध्ये जन्मजात हृदयरोगाचे प्रमाण हजारात 4 पासून हजारात दहा पर्यंत असते . वेगवेगळ्या अभ्यासाद्वारे हे निश्चित झाले की दर हजारात .. जन्माला येणाऱ्या 3 बालकांना अतिशय तीव्र रोगाचा सामना करावा लागतो आणि त्यांना निष्णात हृदयरोग तज्ज्ञाची गरज पडते यावरून जन्मजात हृदयरोगाचे निदान लवकरात लवकर होणे किती आवश्यक असते हे प्रकर्षाने लक्षात येते . आणि हे आता गर्भ इकोकार्डिओग्राफी च्या साह्याने गर्भाच्या सुरुवातीच्या काळात करणे शक्य झाले आहे . गर्भ इकोकार्डिओग्राफी काय आहे ?(What is Fetal Echocardiography?) गर्भ इकोकार्डिओग्राफी ही एक अल्ट्रासाऊंड परीक्षा आहे याद्वारे बाळाच्या हृदयाच्या स्थितीचे नेमके ज्ञान गर्भार काळातच होऊ शकते . इकोकार्डिओग्राफी द्वारा हृदयाचा आकार व कार्याचे मूल्यमापन केले जाते . स्त्री 18 ते 24 आठवड्या